नाशिक ऑक्सिजन गळतीत 11 रुग्ण दगावले : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. अनेक रुग्ण अत्यवस्थ असून मृतांचा एकदा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२.३०च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे,तर अनेक जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. या टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवल आहे, असेही ते म्हणाले.

एकीकडे राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत ११ ते १२ रुग्ण दगावल्याची माहिती नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.घटनास्थळी भेट दिली. यानंतर माहिती देताना आयुक्त बोलले,”याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. घटनेला कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल केला जाईल. आता परिस्थिती नियंत्रणात असून आत्ता उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना कुठेही हलवण्याची गरज नाही.” अशी माहितीही त्यांनी दिली आहे. यावेळी १५० रुग्ण ऑक्सिजनवर होते त्यापैकी २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. यातीलच ११ ते १२ जण दगावले असल्याची माहितीही कैलास जाधव यांनी दिली. तसेच ही तांत्रिक बाब असून आत्ता याबाबत मी कोणतीही माहिती देत नाही. मात्र तातडीने उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन टाकीत गळती झाल्याची झाली. हॉस्पिटलच्या ठिकाणी असलेल्या टाकीत ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ऑक्सिजनची गळती सुरू झाली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर असलेल्या १३१ रुग्णांचा जीव धोक्यात आला.