पेन्शन, भविष्य निर्वाह निधी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद, २३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नागपूरचे महालेखाकार कार्यालय आणि औरंगाबादचे सहसंचालक, लेखा व कोषागरे कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे दोन दिवसीय पेन्शन, भविष्य निर्वाह निधी कार्यशाळा उत्स्फूर्त प्रतिसादात नुकतीच पार पडली. कार्यशाळेस मराठवाड्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, पेंशन संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थ‍ित होते.

कार्यशाळेत पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्यांचे तज्ज्ञांनी तत्काळ निराकरण केले. कार्यशाळेत किमान दीडशेपेक्षा जास्त पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीच्या समस्यांची प्रलंबित प्रकरणे  निकाली काढण्यात आल्याची माहिती सहसंचालक श्री.सोनकांबळे यांनी दिली.कार्यशाळेला वरिष्ठ उप-महालेखाकार दिनेश माटे, लेखा व कोषागरेचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे,  सहायक संचालक (प्रशासन) तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ.सुनंदा ढवळे, सहसंचालक शर्मिष्ठा शिंदे महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.