वैजापुरात महाविकास आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद,सकाळी 12 पर्यंतच बाजारपेठ बंद

वैजापूर ,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वैजापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.सोमवारचा आठवडी बाजार असल्याने दुपारी बारा वाजेपर्यंतच  बाजारपेठ बंद होती.बारानंतर मात्र सर्व व्यवहार सुरू झाले.

Displaying IMG-20211011-WA0084.jpg

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी,शहरप्रमुख राजेंद्र साळुंके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ,शहराध्यक्ष काझी मलिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर,शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत,जिल्हापरिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर शहरातून फेरी काढून व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Displaying IMG-20211011-WA0129.jpg

व्यापाऱ्यांनाही या आवाहनाला प्रतिसाद दिला.मात्र सोमवारचा आठवडी बाजार असल्याने दुपारी बारा वाजेपर्यंतच शहरातील बाजारपेठ बंद होती.दुपारी बारा वाजेनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

Displaying IMG-20211011-WA0145.jpg

महाआघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून काढलेल्या फेरीचा गांधी मैदान रोडवर समारोप करण्यात आला.यावेळी आ.रमेश पाटील बोरणारे,माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची भाषणे झाली.उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला. 

Displaying IMG-20211011-WA0146.jpg

महाविकास आघाडीने पुकारलेला आजचा बंद  यशस्वी करण्यासाठी शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांचासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शहराध्यक्ष काझी मलिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर,शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत,जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, विशाल साळुंके,प्रहार संघटनेचे ज्ञानेश्वर घोडके,नगरसेवक प्रकाश चव्हाण,सुनील बोडखे, मधुकर साळुंके,रावसाहेब मोटे,बाबासाहेब गायकवाड, सुशील आसर,ज्ञानेश्वर टेके,सलीम वैजापुरी,साईनाथ मतसागर,रियाज शेख, राजू कुरेशी आदी कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.