“म”कारवाले व्यक्ती भक्तीचे अधिकारी नाहीत:स्वर्वेद​ ​द्वितीय मण्डल अष्टमअध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मद्य मांस मैथुन मनट, मनमुख​ ​मदन मकार । 

मदी मदान्धी मनसुआ, भक्ति नहीं​ ​अधिकार ।।१५।। 

(स्वर्वेद​ ​द्वितीय मण्डल अष्टमअध्याय) ०२/०८/१५

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मद्यपी, मांसाहारी, मैथुन, मनट (गुप्त पाप करणारा),  मनमुखी (गुरू नियम सिद्धांताविरुद्ध चालणारा), मदन (कामदेव), मदी (अभिमानी),  मदांधी (गर्वोन्मत्त, ), मनसुआ (स्त्री-लंपट) आणि विषयी हे सर्व उपरोक्त “म”कारवाले व्यक्ती भक्तीचे अधिकारी नाहीत.

संदर्भ : *स्वर्वेद* 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org