वैजापूर तालुक्यातील तीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे 18 लाख रुपये खर्चाची “क्वालिअर इंप्लान्ट” शस्रक्रिया मोफत

भक्ती, अर्णव व ईशान या चिमुकल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात शासकीय यंत्रणेला यश
जफर ए. खान

वैजापूर, ८ नोव्हेंबर :-

तालुक्यातील मनेगाव व डागपिंपळगाव येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन कर्णबघिर विद्यार्थ्यांची क्वालिअर इंप्लान्ट यशस्वी शस्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली असून विशेष शिक्षकांमार्फत त्यांना नियमित स्पीच थेरपी देऊन अध्ययन अध्यापन करण्यात येत आहे.

सन 2020 मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादच्या समवेशित शिक्षण व समता विभागा मार्फत अंगणवाडीताईचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कर्णबधिर विद्यार्थी संदर्भीत करण्यात आले. विशेष शिक्षक यांनी सदरील विद्यार्थ्यांच्या  गृहभेटी घेतल्या. विध्यार्थी यांच्या CASE STUDY करून सदर विध्यार्थीना NRHM मार्फत घाटी येथे तपासणी साठी पाठविण्यात आले.ड्रॉक्टरानी सदर विध्यार्थी यांना कॉक्लिअर इंमप्लांट हा उपचार सुचवला. या उपचारासाठी एका  कानासाठी 9 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. वैजापूर तालुक्यातील विशेष साधन व्यक्ती रमेश बागुल, शिवप्रसाद कोल्हे व विशेष शिक्षक बाबासाहेब जगताप, गणेश साळुंके, आहाद शेख, संतोष मरेवार व संतोष राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन केले. आमदार रमेश पाटील बोरणारे यांचे सहकार्य घेऊन डॉ. वेदी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत भक्ती ज्ञानेश्वर साळुंके व अर्णव योगेश पवार या विद्यार्थ्यांचे कॉक्लिअर इंप्लांट शस्रक्रिया यशस्वीपणे फेब्रुवारी 2022 मद्ये पूर्णत:मोफत करण्यात आली. ईशान महेश जोशी वय वर्ष अडीच या विध्यार्थीचे कॉक्लियर इम्लांट MGM औरंगाबाद येथे

जपान च्या वैद्यकीय तज्ञा मार्फत यशस्वी रित्या फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्णत : मोफत केले.

भक्ती ज्ञानेश्वर साळुंके व अर्णव योगेश पवार हे विध्यार्थी जि प प्रा शा मनेगाव केंद्र बळेगाव ता वैजापूर या शाळेत वर्ग पहिली मध्ये नियमित विध्यार्थी बरोबर शिकत आहे. विशेष शिक्षक यांचे मार्फत त्यांना नियमित स्पीच थेरपी देऊन अध्ययन अध्यापन करण्यात येत आहे.

ईशान महेश जोशी वय अडीच वर्ष हा विद्यार्थी अंगणवाडी डागपिंपळगाव केंद्र विरगांव येथे शिक्षण घेत आहे. ईशान ला विशेष शिक्षक मार्फत स्पीच थेरपी व अध्ययन अध्यापन करण्यात येत आहे. भक्ती, अर्णव आणि ईशान यांना मुख्य प्रवाहात आणण्यात शासकीय यंत्रणेला यश मिळाले आणि सामान्य विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षण सुरु झाले.