वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ – शनिदेवगाव सोसायटीच्या चेअरमन – व्हाईस चेअरमनपदाची बिनविरोध निवड

वैजापूर, ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ व शनिदेवगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयदादा पवार तर व्हाईस चेअरमनपदी सुलोचना पाटील मेघळे यांची निवड झाली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा महाविकास आघाडीच्यावतीने स्वागत सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अविनाश पाटील गलांडे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीनगर) संजय पाटील निकम (माजी सभापती) प्रकाश पाटील चव्हाण (शिवसेना शहर प्रमुख) ज्ञानेश्वर पाटील जगताप (माजी संचालक) मंजाहरी पाटील गाढे (उपसभापती) सिताराम पाटील भराडे (उपतालुकाप्रमुख) उदयसिंह पवार, प्रसाद पवार (उपतालुका प्रमुख युवासेना) प्रवीण भाऊ मेघळे (उपविभाग प्रमुख युवासेना) शिवसेना, युवासेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.