अज्ञान सद्गुरूंच्या ब्रम्हविद्या विवेक, अनुभव-साधनेद्वारे नष्ट होते

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

अन्त:करण अच्छादित, आश वासना नाश ।

जिव तुम संसारी बने, कौन करे भ्रम नाश ।।२०।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय)

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :आपल्या चैतन्यमय स्वरूपाचं ज्ञान न झाल्याने अंतःकरण *प्राकृतीक  आशा- वासनांनी आच्छादित होते म्हणजेच झाकले जाते तेंव्हा जीव संसारी होऊन या अज्ञान भवचक्रात पडून नाना प्रकारच्या कष्टांना प्राप्त करतो. आता प्रकृतीच्या या अनित्य संबंधाचं कारण असलेल्या  भ्रमाचा नाश कोण* करू शकेल ? सद्गुरूंच्या योग-विज्ञानाद्वारे समस्त अज्ञान, मोह आणि भ्रमाचा नाश होतो आणि आत्मा चेतन महान सुखाची प्राप्ती करतो. जड माया आणि चेतन आत्म्याच्या संबंध होण्यामागचे कारण अज्ञान आहे आणि हे अज्ञान सद्गुरूंच्या ब्रम्हविद्या विवेक, अनुभव-साधनेद्वारे नष्ट होते आणि मानव पवित्र आणि उज्ज्वल होतो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org