माया जनित भोगांमध्ये, सुखाच्या भ्रांती द्वारे या मायाजालात अडकून अनेक दु:ख, कष्टांना सहन करतो

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

काॅंच मन्दिर में श्वान जिमि, भूॅंकै छाया देख ।
केहरि कुप भ्रम से गिरै, निज छाया के पेख ।।१६४।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१६४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
काचेच्या घरात बसलेला कुत्रा आपली छाया बघून भुंकत राहातो. सिंह विहीरीत आपले प्रतिबिंब बघून त्याला दुसरा सिंह समजतो आणि क्रोधावेगात येऊन अज्ञानाने त्या विहीरीत उडी मारतो. त्याच प्रमाणे आत्मा संसारातील माया जनित भोगांमध्ये, सुखाच्या भ्रांती द्वारे या मायाजालात अडकून अनेक दु:ख, कष्टांना सहन करतो.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org