शारदा मंदिर कन्या प्रशालेचा शतकोत्तर पंचवर्षीय वर्धापनदिन

सविता जयंत मुळे
दोन सुवर्ण महोत्सवानंतर शताब्दी महोत्सव म्हणजे खरोखरी शंभर नंबरी सोन. आपल्या प्रत्येक अनुभवानं, परिश्रमानं तळपणारा आणि शिक्षण क्षेत्राला एका उज्वल परंपरेचे दर्शन घडवणारा हा स. भु. शिक्षण संस्थेच्या श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेचा शतकोत्तर पंचवर्षीय वर्धापनदिन.
मुलींच्या शिक्षणासाठी आणि मराठी माध्यमासाठी बाळकडू मिळालेल्या चौधरी, राजाराम पोळ, अण्णासाहेब पारगावकर यांनी लावलेलं हे रोप पुढे याच देशप्रमाचे बाळकडू मिळालेल्या धडाडीच्या व निस्पृह कार्य करणा­या मा. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांसारख्यानी प्रयत्नपूर्वक जपले. आजही ही परंपरा जपणा­या कार्यकर्त्यांवर व पदाधिका­यांवर हा वटवृक्ष शतकोत्तर 105 वर्षाचा आहे.
प्रशाला म्हणजे नुसती दगड मातीची इमारत नव्हे, इतिहासाची अनेक स्थित्यंतरे तटस्थपणे अनुभवणारी वास्तू. प्रत्येक परिस्थितीत आपली अस्तित्व टिकवणारी. मराठवाडयात निजामांचे राज्य होते. त्या काळात मराठवाडयातील सर्व शैक्षणिक आणि राजकीय व्यवहार उर्दूतून होत असे. औरंगाबादमध्ये कसलीच स्त्री शिक्षणाची सोय नव्हती. मुलींसाठी 7 वी पर्यंत शिक्षण देणारी एक सरकारी शाळा होती. तिथे उर्दू माध्यमातून शिक्षण दिले जात असे. म्हणून मराठी भाषिक मुली या शाळेत शिकायला जात नसत. या काळात घोषाची पद्धती होती. आणि सरकारी शाळेत विद्यार्थिनींना नेण्यासाठी चोहोबाजूंनी झाकलेल्या गोषाच्या बैलगाडया असत.


अश्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिक मुलीच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी सरस्वती भुवन शिक्षण संस्था या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने 1916 मध्ये श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेची सुरूवात केली. सुपारी हनुमान रोडवर गोकुळदास मोहल्ला नावाच्या वस्तीत एका वाडयात ही शाळा भरत असे. शाळेचे माध्यम मराठी होते. या शाळेमुळे औरंगाबादमध्ये मुली शाळेत जाऊ लागल्या. शाळेचे वातावरण अस्सल मराठी असे. त्यामुळे मराठी भाषेचेच नव्हे तर मराठी संस्कृतीचे संस्कार या शाळेने मुलींवर केले.
श्री शा. मं. कन्या प्रशालेतून बाहेर पडणा­या मुली केवळ सुशिक्षितच नव्हत्या तर त्यांच्यावर मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे आणि राष्ट्रीयत्वाचे संस्कार केले होते. मराठवाडयातील उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळांतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे येथील बहुसंख्यांकाच्या संस्कृतीविरूद्धचे संस्कार केले जात असत. त्यामुळे येथील बहुसंख्यांकांची संस्कृती टिकवणे व ती विकसीत करणे हे कार्य अतिशय महत्त्वाचे मानले गेले. हे कार्य करण्याच्या उद्देशानेच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची स्थापना झाली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मुलींसाठी शाळा स्थापण्याचा विचार केला. त्याचे नाव शारदा मंदिर ठेवले. शारदा हे सरस्वतीचे एक रूप परंतु यात ज्ञानाबरोबर इतरही क्षेत्राशी नाते जोडले होते. म्हणून या शाळेत मुलींना गायन, चित्रकला शिकवण्याची मुद्दाम सोय करण्यात आली. अत्रे गुरूजी हे शाळेला लाभलेले संगीत शिक्षक. त्यांच्यामुळे स्त्री वर्गात गायन कला शिकू लागली. आजही ही कला यशस्वीपणे जोपासली जात आहे. 1995 पासून आजही अश्विन महिन्यातील नवरात्रामध्ये शारदा मंदिर शाळेत शारदोत्सवात, गांधी जयंती दिवशी भजन संध्या, स्नेहसंमेलनात, सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच अनेक शालेय, आंतरशालेय, राजय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थिनी आपली कला यशस्वीपणे सादर करतात.
गेली शतकभर आधुनिक स्त्री वर्ग घडविणारी ही संस्था नावारूपाला आली आहे. ज्या संस्कृतीत स्त्रियांना शिक्षणाची दारे बंद केली होती आणि ती 19 व्या शतकात महात्माफुले यांच्या द्रष्टेपणाने उघडली गेली. त्या संस्कृतीचे अति मागासलेले रूप मराठवाडयात अस्तित्वात होते. गेली 105 वर्षे शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या रूपाने मराठवाडयात अंशत: औरंगाबादमध्ये ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सु डिग्री झाली. स्त्री शिकली की कुटुंबाचे संस्कृतिक आणि नैतिक उन्नयन घडून आले.
105 वर्षीच्या यशस्वी वाटचालीत अनेक राबणारे हात आहेत. धडाडीचे निस्पृह नेतृत्व धडपडणारे शिक्षक, विद्यार्थी आहेतच. शिवाय या संस्थेवर प्रेम करणारे शिक्षणप्रेमी आहेत. लोकाश्रयावर चालणारी ही संस्था कालानुरूप बदलही तितक्याच सहजतेने स्वीकारत गेली आहे. विविध स्पर्धा परीक्षा, विविध कला, क्रीडा, वक्तृत्त्व, नाटय, संगीत या क्षेत्रालाही प्रोत्साहन देत आहे. मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजीही राबवत आहे. प्रशालेतील सर्व घटक सक्रीय सहभाग देतात तेव्हाच विविध उपक्रम यशस्वी होतात हेच या 105 वर्षाचे गमक आहे.
धडा शिकवायचा नसतो, धडा घालून द्यायचा असे आपल्या दैनंदिन कृतीतून, उपक्रमातून दररोज नवे धडे देणारी, संस्काराची शिदोरी माझी शाळा शारदा मंदिर कन्या प्रशाला. भारतीय संस्कृतीत स्त्री मुक्ती ऐवही स्त्री – पुरूष समरसता या भूमिकेतून दोघांचेही स्वतंत्र अस्तित्व मान्य करते. त्याचेच प्रतिनिधित्व करत स.भु. शिक्षण संस्था कार्य करत आहे. खरोखरच विद्यार्थिनीमध्ये सजग असे आत्मभान निर्माण करून स्व-त्व जागवत त्यांच्यातील सत्व वाढवत गेली 105 वर्ष प्रामाणिक काम करत आहे. खरोखर स्वप्नवत वाटणार स्त्री शिक्षण 105 वर्ष वास्तवात उतरवणारा हा यशस्वी प्रवास म्हणजे शारदा मंदिर कन्या प्रशाला.
भारतीय संस्कृतीत स्त्रीमुक्ती ऐवजी स्त्री पुरूष समरसता या भूमिकतून दोघांचेही स्वतंत्र अस्तित्व मान्य करते त्याचेच प्रतिनिधीत्व करत सरस्वती भुवन शिक्षण संस्था कार्य करत आहे. खरोखरच विद्यार्थिनींमध्ये सजग असे आत्मभान निर्माण करून स्वत्व जागवत त्यांच्यातील सत्व वाढवत गेले 105 वर्ष प्रामाणिक काम करत आहे. स्वप्नवत वाटणारे स्त्री शिक्षण वास्तवात उतरवणारा हा यशस्वी प्रवास म्हणजे शारदा मंदिर कन्या प्रशाला.
आजही कोविड-19 या महामारीच्या कालावधीतही द्रष्ट्या संस्था चालकांनी स्मार्ट क्लास, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सोयी करून दिल्या. त्या सक्षमपणे वापरण्यासाठी सर्व शिक्षकांमध्ये विश्वास जागवला त्यामुळे याही परिस्थितीत शाळेची परंपरा जपत सर्व स्पर्धा, व्याख्याने विद्यार्थ्यांना विविध विषयांची शहरातील तसेच शहराबाहेरीलही, देशाबाहेरील वक्त्याचे मार्गदर्शन मिळते आहे.
मी प्रथमत: या प्रशालेची माजी विद्यार्थिनी आजची मुख्याध्यापक, एम.एस्सी., एम.एड. होऊन 1992 मध्ये सहशिक्षिका म्हणून रूजू झाले. प्रशालेत राबवल्या जाणा­या विविध उपक्रमांमधून माझ्यातील प्रयोगशील धडपडया शिक्षकाला संस्थेकडून व प्रशालेकडून सतत प्रोत्साहन देवून माझ्या सर्जनशीलतेला वाव दिला आणि माझी मला नव्याने ओळख झाली. माझ्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास होतहोता एक गणित शिक्षक ते राष्ट्रीय कीर्तनकार या यशस्वी प्रवासासाठी मी प्रशालेची मनापासून ऋणी आहे.
मुलींचे शिक्षण त्यांचा सर्वांगीण विकास याबाबत जर इतिहास लिहिला गेला तर हा इतिहास सरस्वती भुवन शिक्षण संस्था व शारदा मंदिर कन्या प्रशाला याशिवाय पूर्वत्वास जाऊ शकणार नाही.
दुस­याचा अनुभव जाणून घेणं हाही एक मोठा अनुभव असतो. याची कायम प्रचिती या प्रशालेतील समृद्ध स्टाफरूममुळे मिळाली. स्टाफरूम हा शारदा मंदिरचा आत्मा आहे. जीवनात शालेय शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तेही मातृभाषेतील शिक्षणाला जास्त महत्त्व आहे. या चिरंतन सत्यामुळे ही मराठी माध्यमाची श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला शताब्दी पर्यंत यशस्वी वाटचाल क डिग्री शकली याचा अभिमान आम्हाला व मराठवाडयातील जनतेला सदैव राहणार आहे. पुढे ही अशीच उज्वल परंपरा जपत वाटचाल सु डिग्री राहील असा दृढ विश्वास आहे. भविष्यातील वाटचालीतही एक कृतीशील साक्षीदार होणं हे मी माझं भाग्य समजते.

                                      सविता जयंत मुळे 
मुख्याध्यापिका,
                                     माजी विद्यार्थिनी
                                      श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला.