अपार दुःख प्राप्त करूनही अनन्त महाप्रभूला जाणत नाही-स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

हम हमार अभिमान में, भूल पड़े सब जीव ।
दुख अपार सुख लेश है, फिर नहिं जानत पीव ।।१०।। 

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/१०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
अज्ञानी जीव मोह आणि अभिमानामुळे मायेच्या या विषय-सुखात गुरफटलेले आहेत. मायेच्या स्वरूपालाच आपलं स्वरूप समजत आहेत. मी आहे आणि हे माझं आहे या अज्ञान, भ्रमात पडलेले आहेत. संसारात दुःख अपार आहे आणि विषय-सुख लेश मात्र , अल्प आहे, तरीही अज्ञानी जीव हे अपार दुःख प्राप्त करूनही अनन्त महाप्रभूला जाणत नाही, ना ही त्याची भक्ती करतात.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org