वैजापूर तालुक्यातील भायगावगंगा येथे दानवे – खैरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व शिवसेना शाखेचे उदघाटन

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील भायगावगंगा येथे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.8) शिवसेना शाखेचे उदघाटन, शेतकरी मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

सुरुवातीला शिवसेना शाखेचे उदघाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर शेतकरी मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. दानवे, खैरे यांची यावेळी भाषणे झाली.

कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, बाजार समितीचे माजी सभापती ऍड. आसाराम पाटील रोठे, संजय पाटील निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पवार, किशोर हुमे, युवासेनेचे विठ्ठल डमाले, अक्षय साठे, अरुण शेलार, प्रकाश शिंदे, प्रवीण भाडाईत, विजय शेळके, दादासाहेब पगार यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.