मुंबई विमानतळावरील सुरक्षा बंदोबस्तात वाढ

मुंबई : इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबई विमानतळावर काल इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला होता. ईमेल मिळताच तातडीने विमानतळ प्राधिकरणाने विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे आणि विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, हा ईमेल नेमका कुठून आला आणि कोणी पाठवला आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक ६ई ६०४५ मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले, परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही.