चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई ​,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

यापुढे मराठा आरक्षणाबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील आणि जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल आणि यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील.मराठा आरक्षणाबद्दलचा तिढा, मराठा समाजाच्या सोई-सुविधा किंवा आर्थिक बाबी आहेत, त्या सोडवण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली आहे.