चित चेतन सत्ता रहे:स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक”मध्ये रोज खास वाचकांसाठी.

चित चेतन सत्ता रहे,  ज्ञान असीम अनन्त ।

ज्ञान योनि मय पूर्ण है, चित् स्वरुप भगवन्त ।।०२।। (स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय)

 मुळ भाष्याचा मराठी अनुवाद :परब्रह्म नित्य चेतन अस्तित्वाने सदैव प्रकाशमान आहे. ती कुटस्थ सत्ता सदैव एक रूपात विद्यमान असते; त्यामध्ये ऱ्हास, विकास होत नाही.  त्याचा स्वभाव-गुण-क्रिया अनन्त, अनादि आहे.  ती सर्वव्यापी अनन्त सत्ता समस्त ज्ञानांचं कारण आहे तसेच समस्त शास्त्रांचा योनिमूलाधार आहे. ज्ञानस्वरूप प्रभू चेतन एक रस सर्व व्यापक आहे.