आर्थिक वर्ष 2022-23 साठी ​6.48 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन

नवी दिल्ली,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- प्रत्यक्ष कर संकलनाच्या 8 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या  तात्पुरत्या  आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलनाने  स्थिर वाढ नोंदवली आहे.8 सप्टेंबर 2022 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे एकूण 6.48 लाख कोटी रुपये कर संकलन दर्शवते जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण कर  संकलनापेक्षा 35.46% अधिक आहे.

Image

परताव्याच्या समायोजनानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.29 लाख कोटी रुपये आहे.जे  गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 30.17% अधिक आहे.हे कर संकलन आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण बजेट अनुमानाच्या  37.24% आहे.

1 एप्रिल 2022 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत 1.19 लाख कोटी रुपयांचा परतावा वितरीत करण्यात आला आहे,जो मागील वर्षातील याच कालावधीत वितरीत केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 65.29% जास्त आहे.

आतापर्यंत, एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट प्राप्तिकर  (सीआयटी ) आणि वैयक्तिक प्राप्तिकराचा (पीआयटी) वृद्धी दराच्या  संदर्भात , कॉर्पोरेट प्राप्तिकराचा वृद्धीदर  25.95% आहे तर वैयक्तिक प्राप्तिकराचा (एसटीटी सह) वृद्धीदर 44.37% आहे.परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनातील निव्वळ वृद्धी  32.73% आहे आणि पीआयटी  संकलनातील  (एसटीटी सह)  निव्वळ वृद्धी 28.32% आहे.