मनेगाव येथे महिलेस विनाकारण काठीने मारहाण ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर,​८​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- विनाकारण एका महिलेला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मनेगाव येथे बुधवारी घडली. या प्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीनाबाई भास्कर आवारे या आपल्या घरासमोर बसलेल्या होत्या. त्यावेळी गावातीलच गणेश अंबादास आवारे हा तेथे आला व काही एक कारण नसताना त्याने हातातील काठीने मारहाण करून मीनाबाई यांना जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मीनाबाई आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश आवारे याच्या विरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार हे करीत आहेत.