वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आ.बोरणारे यांच्याकडून पाहणी

वैजापूर,४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापुर तालुक्यातील वैजापुर ग्रामीण-2, भगगाव, शेटे वस्ती, डवाळा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाल्याने  आमदार रमेश पाटील यांनी तहसीलदार व कृषि अधिकारी यांना सोबत घेऊन या गावांना भेट देत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.  


काल सायंकाळी वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होऊन कापूस, मका, बाजरी, ऊस, सोयाबीन आदी पिकांना तसेच पपई, मोसंबी, डाळिंब या फळबागाना मोठ्याप्रमाणात फटाका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कापूस व मकाच्या पिकांचे अतोनात नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना या पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत असल्याने आ. बोरणारे यांनी ग्रामीण भागात भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला तसेच तहसीदार व कृषी अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. 

 यावेळी तहसीलदार राहुल गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनार, तालुका कृषी अधिकारी आढाव, कल्याण पाटील जगताप,  बंडूभाऊ जगताप, विठ्ठल जगताप, सरपंच डॉ. इंगळे, उद्धव बहिरट, आप्पासाहेब पवार, अंकुश गायकवाड, किरण इंगळे, योगेश इंगळे, बाबासाहेब इंगळे, शरद गायकवाड, शरद जाधव, रावसाहेब इंगळे, मिथुन बहिरट, दिलीप इंगळे, अभि जाधव, भिमराज जाधव, गणपत वाळुंज, मधुकर कटके, अप्पासाहेब बहिरट, बी.एस. वाळुंज, सिकंदर भाई,  प्रविण जाधव, बाळासाहेब जाधव, आबासाहेब बहिरट, अशोक बहिरट, अर्जुन पडवळ, संतोष तांबे, प्रविण तांबे यांच्यासह तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.