स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वैजापूर शहरातील उर्दू मदरसा शाळेत विविध कार्यक्रम

वैजापूर,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा दिनाच्या अमृत महोत्सव “हर घर तिरंगा” अभियानानिमित्त ​ रविवारी वैजापूर शहरात “दारूल उलुम हजरत सैय्यद शाह रुकनुद्दीन शहीद रहेमतुल्लाह अलैह” मदरसाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली तसेच बेलगांव रस्त्यावरील मदरसा खालिद बिन वलिद एमजीएम वस्तानवी उर्दू शाळेच्यावतीने आयोजित कार्यक्रमास  आ.रमेश पाटील बोरणारे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना आ.बोरणारे यांनी  बिस्किट वाटप केली तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनानिमित्त उर्दू मदरसा या शाळांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाची प्रशंसा केली.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरभाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, डॉ.राजीव डोंगरे, नगरसेवक दिनेश राजपूत, दशरथ बनकर, राजेश गायकवाड, बिलालभाई सौदागर, काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, रियाज शेख, हाजी खलील मिस्तरी  होते.