वैजापूर शहरातील डेपो रोडला डॉ.पी.यु.परदेशी यांचे नाव द्या – माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची मागणी

वैजापूर ,३० जानेवारी / प्रतिनिधी :-  येथील वैद्यकीय क्षेत्रातील संयमी व्यक्तिमत्त्व व वैद्यकीय व्यवसायाला व्यवसाय न समजता जनसेवा मानून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे स्व.डॉ.पी.यु.परदेशी यांचे नाव शहरातील डेपो रोडला देण्यात येऊन कमान उभारण्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केली आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांना दिलेल्या निवेदनात श्री.खान यांनी म्हटले आहे की, स्व.डॉ.पी.यु.परदेशी यांनी शहर व तालुक्यातील जनतेची निःस्वार्थपणे सेवा केली आहे.संयमी व प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे डॉ.पी.यु.परदेशी यांचे वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक होते.गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ही त्यांची ओळख होती. विशेष बाब म्हणून शहरातील डेपो रोडला डॉ.पी.यु.परदेशी यांचे नाव देऊन कमान उभारण्यात यावी.