महाराष्ट्रात आपत्ती असताना सरकारचा पत्ता नाही मंत्र्यांचा पत्ता नाही-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ‘मार्मिक’ टोला लगावला

त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत : उद्धव ठाकरे

मुंबई ,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  ”काहींना असं वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. तसं नाही आहे. शिवसेनेची पाळंमुळं 62 वर्ष तर सरळ दिसत आहेत. पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे.”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

May be an image of 2 people and text that says "वावर्धापनदिन मारमिक अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे, पण तिथे जायला मंत्री आहेत कुठे? मंत्र्यांचे खातेवाटप नाही, मंत्री आझाद आहेत. पद मिळाले आहे, पण जबाबदारी नाही. शिवसेना " शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे"

व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’च्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी संबोधन केलं. या दरम्यान त्यांनी नाव न घेता टोला लगावला.”शिवसेना हा विचार आहे. कुणीही तो घेऊन जाऊ शकत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ‘मार्मिक’ टोला लगावला. भाजपची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना नष्ट होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. महाराष्ट्रात सरकार आहे कुठे? असा सवाल करतानाच पंतप्रधान मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानावरही त्यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यगंचित्रकार काय असतो, व्यगंचित्रकार काय करू शकतो, याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मुंबईत, महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंचं काय झालं असतं, हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. शिवसेना ही एका सकाळी पडलेले स्वप्न नाही. ती अशीच निर्माण झाली नाही. तर मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला.

पुढे ते म्हणाले की, मार्मिकला म्हणता म्हणता 62 वर्ष झाली माझ पण वय 62. मार्मिक 62 व्या वर्षी चिरतरुण. आजोबा बाळासाहेब म्हणायचे विचाराने माणूस थकता कामा नये. देसाई रावते चिरतरुण. मार्मिक शिवसेना हे तरुणांचे आकर्षण. व्यंगचित्र काय करु शकते याचे उदाहरण शिवसेना. मार्मिकने शिवसेनेची बीजं पेरली, अस्वस्थ मन हेरल आणि शिवसेना जन्मली नंतर सामनाचा जन्म झाला. आजोबांपासून विचारांची पेरणी. ज्यावेळा मार्मिकचा जन्म झाला ते साल 1960 तेव्हा देशाचे स्वातंत्र्य 13 वर्षांचे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बलिदान देऊन मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली होती. मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेबांनी व्यंगचित्र आणि शिवसेना दोन्ही काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी शाहिरी पोवाडा असायचा. त्याची थाप पडली की डफावरची कातडीही जिवंत होत होती. तीच ताकद व्यंगचित्रकाराच्या फटकाऱ्यात आहे. हे बाळासाहेबांनी करून दाखवले आहे.

May be an image of 2 people, glasses and text that says "बावर्धापनदिन मार्मिक भाजपची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकणार नाहीत. शिवसेना " शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे"

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत खोचक टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली. “त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावावर किती कुळे आहेत माहिती नाही पण त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत. मग ते बावन असतील किंवा एकशे बावन असतील. मला त्याचा फरक नाही”, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली.

“मी पक्षप्रमुख आहे. मुख्यमंत्री होतो. पुन्हा शिवसेनेची सत्ता येईल. सत्ता ही येत-जात असते. पण नड्डा बोलले की, या देशात फक्त एकच पक्ष राहणार आहे. बाकी पक्ष संपत जाणार आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावावर किती कुळे आहेत माहिती नाही पण त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत. मग ते बावन असतील किंवा एकशे बावन असतील. मला त्याचा फरक नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे हे विचार लोकशाहीला घातक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यांची मांडणी झालीय त्यामध्ये संघराज्याची मांडणी झाली आहे. घटकराज्य एकत्र येवून देशाचं स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे. तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नकोय का? नागरिकांचं हे मत आहे का? त्यावर निवडणुका झाल्या पाहिजे. तुम्ही आज गादीवर बसलात म्हणजे हम करे सो कायदा नाही. अमृत महोत्सवातच तुम्हाला लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“राजकारण हे आपल्या पाचवीलाच पूजलेलं आहे. लोकशाही म्हटल्यानंतर निवडणुका आल्याच. निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आलेच. ते आलेच पाहिजेत. प्रत्येक माणसाचा मत एकच असतं असं नाही. आपली मतं मांडण्याची मुभा ज्या व्यवस्थेत असते तिला लोकशाही म्हणतात. पण गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी आपल्या देशाचा राज्यकर्ता असलेल्या भाजप पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेलं विधान लोकशाहीला घातक आहे की नाही याचा विचार केला पाहिजे”, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी घर घर तिरंगाच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली. ज्यांच्याकडे घर नाही ते तिरंगा लावणार कुठे? असा सवाल ठाकरेंनी केला. आझादी म्हणजे स्वातंत्र्य. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र झालो त्याला 75 वर्ष झाली. त्याआधी दीडशे वर्षाचा गुलामगिरीचा कालखंड गेला. त्यानंतर 75 वर्ष पूर्ण करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपण पुन्हा गुलामगिरीत जातोय का? हा विचार करायला हवा, असं ठाकरे म्हणाले.