एबीएस सोशल ग्रुपच्यावतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

महात्मा फुले नगर येथे गायनाचा कार्यक्रम
वैजापूर,३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- एबीएस सोशल ग्रुपच्यावतीने वैजापूर शहरातील इंदिरानगर व दुर्गानगर भागात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले नगर येथे सुप्रसिद्ध गायक सोनू साठे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. 

दुर्गानगर- इंदिरानगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मा. नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष साबेर भाई, हाजी अकील शेठ, शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते प्रकाश चव्हाण, तालुका प्रमुख सचिन वाणी, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, विठ्ठल डमाले, अक्षय साठे, शहाणे सर यांनी अभिवादन केले. तर महात्मा फुलेनगर (मोंढा मार्केट) येथे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, काँग्रेसचे साहेबराव पडवळ, नगरसेवक प्रकाश चव्हाण यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. 

शिवसेनेचे एबीएस सोशल ग्रुपच्या वतीने 150 गरजवंत विद्यार्थीना शालेय साहित्य ही वाटप करण्यात आले. तर कार्यक्रमाचे आयोजन ABS सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष विजुभाऊ त्रिभुवन(बाबा), उपाध्यक्ष सचिन बागुल, अजय त्रिभुवन, सतीश त्रिभुवन, अशोक त्रिभुवन, रोहन पेटारे, मंगेश आरणे, सुरज म्हस्के, सचिन थोरात, अण्णा त्रिभुवन,सिद्धार्थ गायकवाड,सुरज त्रिभुवन, शुभम पेटारे यांनी केले.व या वेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना किशोर प्रसाद, सुरज प्रसाद, विलास म्हस्के, सोनू राजपूत, विजय लोधे, साहेबराव पडवळ,धर्मेंद्र त्रिभुवन, रवी पगारे, शिवा थोरात, आवेज भाई, रुद्रा शेजवळ, अविनाश त्रिभुवन, राजू लोधे, अजय लोधे,प्रकाश त्रिभुवन, भैया पठारे यांनी अभिवादन केले.