वैजापूर कांदा मार्केटमध्ये मे महिन्यात 5 कोटी 92 लाख रुपयांची कांदा खरेदी ; कांद्याला 1430 रुपये भाव

वैजापूर ,८ जून  /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सुधारले असून वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये आज एक नंबर कांद्यास 1400 ते 1450 रुपये तर कमीत कमी 300 रुपये भाव मिळाला. सरासरी 700 रूपये भावाने कांदा खरेदी करण्यात आला.

वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एप्रिल महिन्यात 4 कोटी 53 लाख 29 हजार 755 रुपये किंमतीचा 71111.4 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला तर मे महिण्यात 5 कोटी 92 लाख 76 हजार 823 रुपये किंमतीच्या 1,15,969.97 क्विंटल कांद्याची आवक झाली.कांद्याच्या भावात सारखी चढउतार हिट असून कांद्याला सध्या 140प ते 1450 रुपये भाव मार्केटमध्ये मिळत आहे.कांद्याचे भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे त्यांना चांगला भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करून विक्रीला आणावा. विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम रोख स्वरूपात किंवा त्याच दिवसाचा चेक घ्यावा न मिळाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर व सचीव पी.के. मोटे यांनी केले आहे.