कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे,शरद पवार यांनी केली मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण

औरंगाबाद दि. 25 -आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. यामुळे मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी, असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. ही कमतरता आहे ती पूर्ण करा, मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण केली.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचं आहं. यासाठी मी दौरे करतोय, मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सवय आहे. यामुळे मी फिरत असतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय, असं शरद पवारांनी सांगितलं.

राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तमरित्या या आपत्ती स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. त्यामध्ये राज्य शासनाला येणाऱ्या अडचणी, आवश्यक निधी याबाबत केंद्र सरकारकडे माहिती देण्यासाठी कोरोना रूग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्यांना आपण भेट देत असून लोकप्रतिनिधीसोबत तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *