खो-खो आणि कबड्डी सराव करण्याकरिता क्रीडांगणासाठी आ.अतुल सावेंना साकडे

खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे यांची मागणी 

औरंगाबाद ,४ जून /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या  पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद पूर्वचे आमदार श्री अतुल सावे यांची भेट घेतली. यावेळी खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीरभैया मुळे यांनी पूर्व मतदारसंघात औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन करिता दैनंदिन खो-खो आणि कबड्डी या मैदानी  खेळाच्या सराव करण्यासाठी मैदान आणि असोसिएशनच्या  कार्यालयसाठी त्याच मैदानावर जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी आज भेटीदरम्यान करण्यात आली.                   

भारतीय मैदानी खेळाचा प्रचार तसेच प्रसार व्हावा, याकरिता जिल्ह्यातील खो-खो खेळाडू, मार्गदर्शक व पालक आणि पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेऊन सकारात्मक प्रयत्न करतात. आपल्या जिल्ह्यातील खो-खो आणि कबड्डी खेळाडू उच्चस्तरावर नाव लौकिक करण्यासाठी मैदानाची गरज भासते आणि स्थानिक खेळाडूंना दैनंदिन सराव करण्यासाठी मैदानाची खूप गरज आहे, दि.औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन जिल्ह्यात ज्या ठिकाणी खो-खो आणि कबड्डी मैदान भेटेल, तिथे मेहनत करून खेळाडू तयार करत असते, भरपूर ठिकाणी मैदान नसल्यामुळे सराव करता येत नाही. तसेच त्यांना आपल्यातील कलागुण आणि कौशल्य दाखवता येत नाही. आमदार श्री अतुल सावे म्हणाले, ‘ खो-खो आणि कबड्डीच्या विकासासाठी ज्या काही सूचना असतील त्या आपण अवश्य द्याव्यात, त्याची पूर्तता मी नक्की करेन. औरंगाबादच्या खेळाडूंमुळे जिल्ह्याचे नाव अभिमानाने घेतले जाईल, लवकरच खो-खो आणि कबड्डी या खेळासाठी अद्ययावत मैदान उपलब्ध करून देईन. असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.  ,       

निवेदन देतेवेळी औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर भैया मुळे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, सचिव  विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.