तलवाडा सोसायटीच्या चुरशीच्या लढतीत बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय

पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पॅनेलचा धुव्वा

वैजापूर ,१९ मे /प्रतिनिधी ;- वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती भागीनाथ दादा मगर यांच्या पॅनेलने 13 पैकी 13 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला तर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र मगर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघ

पवार नाथू फकिरा (293), मगर गोरखनाथ माणिक (322), मगर तातेराव नामदेव (313), मगर नारायण कचरू (309), मगर भागीनाथ शहादराव (346), मगर रवि दादासाहेब (317), मगर राजेंद्र शावलाल (296), मगर ज्ञानेश्वर भिवसन (292)

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ

बागुल हरिभाऊ भागीनाथ (330)

भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघ

पवार बबन आश्रू (बिनविरोध)

महिला राखीव मतदारसंघ

मगर अपर्णा काशीनाथ (342) ,शेख गुलशादबी अकबर (290)

इतर मागासवर्गीय मतदारसंघ

गवंदे बाबासाहेब उत्तम (300)