केंद्रीय मंत्री शेखावत यांनी राजीनामा द्यावा : अजय माकन

जयपूर,
अशोक गहलोत यांचे सरकार उलथून लावण्याचा कट आखणारे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी आज रविवारी केली.

See the source image
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा आणि शेखावत यांच्यातील चर्चेची ध्वनिफीत समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. भाजपा नेते संजय जैन यांचाही या कटात समावेश आहे. ध्वनिफीतमधील आवाज आपला नाही, असा दावा शेखावत करीत आहेत. हीच सत्यता असेल, तर आवाजाचे नमुने देण्यासाठी ते का घाबरत आहेत, त्यांनी व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी सुरक्षित ठिकाण म्हणून हरयाणाचीच निवड का केली, असा सवाल माकन यांनी केला. हरयाणा आणि दिल्लीचे पोलिस शेखावत आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *