शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाड्यात आंदोलन

औरंगाबाद ,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौक औरंगाबाद येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औरंगाबाद चे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील साहेब यांचे नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मयूर सोनवणे व कार्याध्यक्ष कयूम शेख यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला.

तसेच यावेळी अण्णासाहेब माने,महेश उबाळे,रावसाहेब टोगे,डॉ ज्ञानेश्वर निळ, कैलास सौदागर, अंकुश कालवणे,बाळासाहेब सावंत, बादशहा अन्सारी, मधुकर हांडे,विशाल विराले,अक्षय शिंदे,सचिन उसारे, ऋषिकेश खैरे, सुफियान बागवान,अमरजीत पवार,मनोज कुलकर्णी,आयान पटेल,वसीम मणियार,जुबेर खान,सुशील अंभोरे,संदीप शिरसाट,रोहित रोटे,जयंत जोहारे,आकाश हिवाळे,सचिन शिंदे,सचिन चव्हाण,गणेश अडसूळ,शुभम खेत्रे,दादासाहेब फल्ले,मिलिंद जमदाडे,शुभम साळवे,अनिकेत चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,भारत कावळे,राहुल ढीलपे,विजय निकाळजे,निझाम शेख, अजहर शेख,मंथन बदर,सौरभ मगरे,मुजफ्फर शेख,अमोल थाठे, करणं साळे,प्रवीण मगरे,गोरख जाधव, अशोक हिवाळे, सोमनाथ पाचोने,पांडुरंग शिंदे, अभिजित खरतोडे,निखिल झळके,करणं शिंदे,काशिनाथ गिरी, भावेश जाधव आदींची उपस्थिती होती.

महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

May be an image of 9 people, people standing and outdoors

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात माजी आमदार शंकरराव धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. तसेच नांदेड अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.

उमरगा येथे काळ्या फिती लाऊन शांततापूर्ण निषेध आंदोलन

May be an image of 8 people and people standing

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरगा तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश दाजी बिराजदार तसेच उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा भाई जाफरी यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लाऊन शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी जेष्ट नेते जाफरशेठ कारचे प्रतापजी तपसाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.जगदीश सुरवसे उमरगा लोहारा विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील नगरसेवक बालाजी पाटील अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष हजीसाहब सय्यद शहराध्यक्ष सुशिल दळगडे तालुका कार्याध्यक्ष धिरज बेंबळगे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मौन आंदोलन

May be an image of 4 people, people sitting, people standing, outdoors and text that says "@shirvod देशाचे नेते आदरणीय शारदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर झालेल्या म्याड हल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रे उस्मानाबाद डॉ.बाबासाहेब मन्दबाचण आबेडकर 823 一 JATBHIN Sa"

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मौन आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, मूक आंदोलन

May be an image of 6 people, people standing and text that says "ÛMiLe मुकआंदोलन वा दी"

खा. शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परळी, अंबाजोगाई, केज यासह बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने, मूक आंदोलन तसेच काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनास निवेदने देऊन दोषींवर कार्यवाहीची मागणी केली.

चौकशी करण्यासाठी निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज उदगीर जळकोट तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसील कार्यालयात घटनेची चौकशी करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी पक्षाने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांकडून भडकवले जात आहे, द्वेषाचं वातावरण तयार करण्यात येत आहे. एसटी कर्मचारी व पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४०-५० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन पवार साहेबांनी कधीही चुकवले गेले नाही. राज्यात ज्या ज्या वेळी कष्टकरी, कामगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांना समजून घेऊन ते सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी सदैव प्रयत्न केले आहेत. कालच्या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला गेला आहे. या कटामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी. अन्यथा आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

काळ्या फिती लावून घटनेचा निषेध

शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी आपल्या मतदारसंघात काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. तसेच या घटनेची चौकशीसंदर्भात बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले. यावेळी बीड शहरातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.