वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने

वैजापूर,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यवतीने शनिवारी दुपारी येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी निषेधपर भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पवार, राजेंद्र पाटील मगर, दत्तू पाटील त्रिभुवन, साईनाथ मतसागर, सतीश शिंदे, सुरजनाना पवार, मंजाहरी पाटील गाढे, रिखब पाटणी, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब शेळके, संदीप पवार, मच्छिंद्र त्रिभुवन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.