पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत तीन कोटींपेक्षा जास्त घरे

देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पावले उचलत आहे: पंतप्रधान

नवी दिल्ली,८ एप्रिल /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पावले उचलत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत. या सर्व घरांमध्ये मुलभूत सोयी पुरविण्यात आल्या आहेत आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या संदर्भात पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे,

“देशाच्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याच्या संकल्पात आपण एका महत्वपूर्ण टप्प्यावर आलो आहोत. सर्वसामान्य जनतेच्या सहभागातूनच तीन कोटींपेक्षा जास्त घरांचे बांधकाम शक्य झाले आहे. मुलभूत सोयी असलेली ही घरे आज महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनली आहेत.”