कोविड -19 रूग्ण बरे झालेल्यांची संख्या चार लाखांवर  पोहोचली  

बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा जवळपास 1.65 लाखांनी अधिक

नवी दिल्ली, 5 जुलै 2020

कोविड -19 च्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारसह राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या समन्वित आणि केंद्रीभूत प्रयत्नांमुळे कोविड -19 रूग्ण बरे झालेल्यांची संख्या 4,09,082 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 14,856 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.

आत्तापर्यंत, कोविड-19 रुग्ण बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 1,64,268 ने जास्त आहे. यामुळे कोविड-19 रुग्ण बरे झालेल्यांचे देशातील प्रमाण 60.77% वर पोहोचले आहे.

सध्या 2,44,814 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

रुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असलेली 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहेः

अनुक्रमांकराज्य/केंद्रशासित प्रदेशरुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण
1चंदिगढ85.9%
2लडाख82.2%
3उत्तराखंड80.9%
4छत्तीसगढ80.6%
5राजस्थान80.1%
6मिझोराम79.3%
7त्रिपुरा77.7%
8मध्य प्रदेश76.9%
9झारखंड74.3%
10बिहार74.2%
11हरियाणा74.1%
12गुजरात71.9%
13पंजाब70.5%
14दिल्ली70.2%
15मेघालय69.4%
16ओदिशा69.0%
17उत्तर प्रदेश68.4%
18हिमाचल प्रदेश67.3%
19पश्चिम बंगाल66.7%
20आसाम62.4%
21जम्मू आणि कश्मीर62.4%

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 786 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 314 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1100 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 591 (शासकीय: 368 + खाजगी: 223)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 417 (शासकीय: 385 + खाजगी: 32)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 92 (शासकीय: 33 + खाजगी: 59)

कोविड-19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी राबविण्यात आलेले “चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरण आणि व्यापक चाचणीची सोय करण्यासाठी अलीकडेच झालेल्या विविध उपाययोजनांमुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,48,934 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 97,89,066 आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘जनरल मेडिकल अ‍ॅण्ड स्पेशलाइज्ड मेंटल हेल्थ केअर
सेटिंग्झस’ साठी (सर्वसाधारण वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य विशेष सेवा) मार्गदर्शक पुस्तिका’ जारी केली आहे.

कोविड-19 च्या लक्षणांविषयी आणि सावधगिरीविषयी  जागरूकता निर्माण करण्यात  गोगी देवीसारख्या विविध आशा कार्यकर्त्यांनी राजस्थानमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात बरीच मदत झाली आहे. त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोविड-19  च्या नियंत्रण आणि व्यवस्थापनातील सरकारी प्रयत्नांना बळ देण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि स्थानिक सामाजिक घटकांच्या ज्ञानाचा उपयोग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *