भारतात गेल्या 24 तासात 70,421 नव्या कोरोना रुग्णांची नोंद,74 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट

  • 66 दिवसानंतर भारतातली  उपचाराधीन रुग्णसंख्या 10 लाखापेक्षा कमी
  • महिन्याभराहून जास्त काळ दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची  संख्या जास्त
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.43%
  • दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 4.72%, हा दर 3 आठवडे 10 % पेक्षा कमी

नवी दिल्ली ,१४ जून /प्रतिनिधी :- भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी आहे.गेल्या 24 तासात देशात 70,421 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सातव्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फलित आहे.

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे. देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या आज 9,73,158 आहे. 66 दिवसानंतर भारतातली उपचाराधीन रुग्णसंख्या 10 लाखापेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 53,001 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 3.30% आहेत.

कोविड-19 संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग 32 व्या दिवशीही जास्त आहे.गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

गेल्या 24 तासात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे 50,000 (49,080) ने अधिक होती.

महामारीच्या सुरवातीपासूनच्या कोरोना बाधितामधून 2,81,62,947 लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर उंचावत असून हा दर 95.43%, झाला आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून गेल्या 24 तासात 14,92,152 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत सुमारे 38 कोटी(37,96,24,626) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्या वाढवत असतानाच साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 4.54% असून दैनंदिनपॉझीटीव्हिटी दर आज 4.72% आहे. सलग 21 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 35,32,375 सत्राद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकूण 25,48,49,301 मात्रा देण्यात आल्या.

कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि वेगवान धोरणाला 1 मे 2021पासून सुरुवात झाली. या धोरणानुसार, दरमहा, कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा भारत सरकार खरेदी करेल. आधीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 26.68 कोटींपेक्षा जास्त (26,68,36,620) लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,
वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 25,27,66,396 मात्रा देण्यात आल्या आहेत.

लीपोसोमल अम्फोटेरिसिन-बी या औषधाच्या अतिरिक्त 1,06,300 वायल्स सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना आज वितरित करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाच्याही एकूण 53,000 वायल्स सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

कोविड-19 विरोधातल्या लढ्यात देशाच्या ऑक्सिजनबाबतच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने, देशाच्या विविध जिल्ह्यात, पीएम केअर्स निधीतून 850 ऑक्सिजन सयंत्रे उभारण्यात येत असल्याची माहिती,डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव डॉ सी सतीश रेड्डी यांनी दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ व्याख्यानमालेत ते बोलत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबईसाठीही दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतही आज सर्वात कमी रुग्णसंख्या दिसून आली आहे.  मुंबईत प्रथमच नवीन 530 रुग्ण सापडले आहे. तर राज्यात कोरोनाचे 8 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभरात 200 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबईसाठीही दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतही आज सर्वात कमी रुग्णसंख्या दिसून आली आहे.मुंबईत प्रथमच नवीन 530 रुग्ण सापडले आहे. तर राज्यात कोरोनाचे 8 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.आज दिवसभरात 200 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात प्रथमच कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात8 हजार 129 नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. दरम्यान, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून जास्त आहे.

राज्यात आज 200 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. तर राज्यातील मृत्यूदर 1.9  टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 54 हजार तीन रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, राज्यात रविवारपर्यंत 2 कोटी 59 लाख 09 हजार 078 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 13 जून 2021 रोजी 88,134 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.