मानस फाउंडेशन उदघाटन समारंभ रविवारी

लेखक,कॉर्पोरेट सीईओ अच्युत गोडबोले यांचे ‘ मनातला मुसाफिर ‘ विषयावर मार्गदर्शन

जालना,२ एप्रिल / प्रतिनिधी :- मानसिक आरोग्य  समुपदेशनासह जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशन स्थापना करण्यात आली आहे. फाऊंडेशनचा रविवारी सायंकाळी ६ वाजता उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आपल्याच तळमनाचा शोध घेण्यासाठी मानस फाऊंडेशन मानसिक आरोग्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील नाव्हा चौफुली परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल बाजूला मानस हॉस्पीटल परिसरात उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

मानस फाऊंडेशनचे उदघाटन लेखक,तंत्रज्ञ,अच्युत गोडबोले यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमात ‘ मनातला मुसाफीर ‘ या विषयावर कार्पोरेट सीईओ, प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले संवाद साधणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील निवृत्त भारतीय नौसेना अधिकारी सर्जन कमोडोर सुनिल गोयल हे राहतील. यावेळी गेवराई येथील बालग्रामचे संतोष गर्जे, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर, डाॅ.शीतल आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी जालनेकर नागरिकांनी व्याख्यानास उपस्थित राहावे,असे संयोजन समिती सदस्य डाॅ.सुजाता देवरे,डाॅ.सुहास सदाव्रते,डाॅ.यशवंत सोनुने,सतीश खरटमल, विनोद जैतमहाल ,बाबासाहेब डोंगरे, सचिन महाजन,डाॅ.प्रणिता राठोड,सुनील सोलाट, स्वप्नील रगडे यांनी कळविले आहे.