वैजापूर शहरात महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन,126 स्पर्धकांचा सहभाग

वैजापूर,१४ मार्च  /प्रतिनिधी :- कोरोनामुळे घरात कोंडून घेणाऱ्या महिला व मुलींना आपल्या सुप्त कलागुण व हस्त कौशल्य दाखवून त्यांना आनंद मिळावा व त्यांनी मुक्तपणे रांगोळी काढावी म्हणून नगरसेवक स्वप्नील जेजुरकर व भाजपा ओ.बी.सी सेल चे शहराध्यक्ष धनंजय अभंग यांच्यातर्फे भव्य खुली रांगोळी स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. 

Displaying IMG-20220313-WA0124.jpg

 महिला व मुलींना खुल्या व मुक्त वातावरणात कौशल्याची संधी दिली गेली. प्रथम गट 7 ते 15 वर्ष व दुसरा गट 16 वर्षापुढील सर्व  या खुल्या रांगोळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रथम गटात 61 मुलींनी तर 16 वर्षापुढील 65 महिलांनी अशा  एकूण 126 स्पर्धकांनी सहभाग घेतला. पर्यावरण, स्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाओ, पाणी वाचवा-जीव वाचवा, से नो टु प्लास्टिक ,कोरोना खबरदारी, माझी वसुंधरा, झाडे लावा -झाडे जगवा अशा विविध विषयांवर रांगोळ्या काढून जागृती ही केली. 
प्रथम गटात प्रथम गौरी श्रीकांत दारवंटे (प्रथम पारितोषिक 2100), क्रांती अशोक साळुंके (द्वितीय पारितोषिक 1100 रुपये ), भावना अनिल चव्हाण (तृतीय पारितोषिक), आदिती संतोष गायकवाड बक्षीस ( उत्तेजनार्थ 501 रुपये ) तर द्वितीय गट प्रथम प्रगती राम गावडे (प्रथम पारितोषिक 2100 रुपये)  सोनाली सागर राजपूत ( द्वितीय पारितोषिक 1100 रुपये), उर्मिला मनोहर वाघचौरे (तृतीय पारितोषिक 701रुपये), दर्शना रितेश शिंदे (उत्तेजनार्थ बक्षीस 501 रुपये ) 

या सर्व विजयी स्पर्धकांना नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, संगीता बोरनारे, नगरसेविका जयश्री दिनेश राजपूत, सुप्रिया व्यवहारे, डॉ,प्रीती भोपळे, नंदाबाई बबन त्रिभुवन, सीमा देशपांडे, अबोली बोरनारे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक  प्रदान करण्यात आले. सूत्रसंचलन श्रीमती खैरनार यांनी केले तर प्रास्ताविक धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. परीक्षक सुवर्णा बोर्डे, श्रीमती.दारवंटे तर सहायक म्हणून रोहिणी जेजुरकर यांनी काम पाहिले.