भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 36168,गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या

गेल्या 24 तासांत देशात 2503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद,गेल्या 680 दिवसांतील सर्वात कमी

लसीकरण मोहिमेत 180 कोटी 19 लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली,१४ मार्च  /प्रतिनिधी :-कोरोनामुक्तीवर वैशिष्ट्यपूर्णपणे विजय  मिळवत, भारतात गेल्या 24 तासांत 2,503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या 680 दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 36,168 इतकी असून गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.देशातील  कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.08% आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.72% वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 4,377 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,41,449 झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 5,32,232 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 90 लाखांहून अधिक (77,90,52,383) चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशभरात  दररोजच्या आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत असून सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.47% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.47%.इतका झाला आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 180 लाख 19 हजारांहून अधिक  (1,80,19,45,779) मात्रा देण्यात आल्यामुळे,, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 180 कोटी 13 लाखांचा (180,13,23,547) टप्पा ओलांडला आहे.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार देशभरात एकूण 2,10,99,040 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.