इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर , ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल

जो रूटचे दमदार द्विशतक

चेन्नई,6 फेब्रुवारी 2021:
भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याता इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला आहे.खेळाच्या दुसऱ्या दिवशी पहिले दोन सत्रात पाहुण्या संघाचे वर्चस्व राहिले.शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी थोडं यश जरूर मिळवलं परंतु जो रूटच्या खेळीने इंग्लड एका मजबूत स्थितीत पोहचला आहे.

चेपॉक मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिला सामना सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघानं तुफान फलंदाजी गेली आहे. त्यांच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी होत असल्याचं दिसत आहे.

Image

१००व्या कसोटीमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम रूटच्या नावी
जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी ९२ धावांची भर घातली. . बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकार खेचले. रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रूट १९ चौकार २ षटकारांसह २१८ धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (३४), बटलर (३०) हे झटपट बाद झाले. त्यानंतर डॉम बेस (२८) आणि जॅक लीच (६) यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.

 जो रूटचा हा 100वा कसोटी सामना आहे. त्यानं सुरुवातीपासूनच आपली फलंदाजी जोरदार केली. दुहेरी शतकी खेळीनंतर मात्र जो रूला तंबुत पाठवण्यात भारतीय संघाच्या गोलंदाजाला अखेर यश आलं आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटला तंबुत परत पाठवण्यात स्पिनर शाहबाद नादीमला अखेर यश आलं आहे.

Image