सक्षमीकरणासाठी महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी – कीर्ती अग्रवाल

महिला दिन : उडान ग्रुप तर्फे  वृक्षारोपण,स्नेहमिलन व संवाद 

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :- स्त्री भ्रूण हत्या, असमानता,शोषण, शिक्षण व रोजगाराच्या संधी यात पूर्वीपेक्षा परिस्थिती सुधारली असली तरी महिलांनी स्वतः च्या सक्षमीकरणासाठी अंगभूत कलांद्वारे उद्योग ,व्यवसायात भरारी घ्यावी असे आवाहन उडानच्या संस्थापिका कीर्ती अग्रवाल यांनी केले. 
 उडान ग्रुपच्या वतीने महिला दिन  पर्यावरणपूरक साजरा करण्यात आला. जालना शहराजवळील सामाजिक वनीकरण  उद्यानात  उद्यमशील महिलांनी एकत्रित येत प्रारंभी वृक्षारोपण केले. स्नेहमिलन व संवाद साधला. कीर्ती अग्रवाल यांनी दर्जेदार उत्पादन, तत्पर सेवा , सचोटी, उत्तम संवाद कौशल्य व सातत्य राखले तर व्यवसाय भरभराटीस येतो. हे महिलांनी सिद्ध करून दाखवले. असे नमूद करत महिलांना स्वयंरोजगारासाठी ग्रुप प्रयत्नशील राहील अशी ग्वाही कीर्ती अग्रवाल यांनी दिली. 

Displaying 1646821466426.jpg

महाएक्सपोच्या यशस्वी आयोजनाबद्दल महिला सदस्यांनी कीर्ती अग्रवाल यांचा जाहीर सत्कार केला  तसेच आपापल्या व्यवसायाची माहिती दिली. वयस्कर असलेल्या लता अबोटी यांच्या  उद्यमी पणाचा महिलांनी विशेष गौरव केला .कार्यक्रमास नसीम शेख ,माया शर्मा, दीपा भानुशाली, रेखा भानुशाली, सुजाता मुथा, ज्योती मेरूकर,टिना शाह, ज्योती जोशी, मेघना डमडोरे ,रचना धनानी,  वैशाली साळवे  यांच्या सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

महिला दिन उत्साहात साजरा

अंबड चौफुली परिसरातील रूप नगर भागात असलेल्या अनमोल भवन येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षा  नतिका भगत व प्रमुख पाहुण्या जिजाऊ ब्रिगेड च्या विभागीय अध्यक्षा विभावरी ताकट यांनी महिलांच्या सक्षमीकरणात बाबत मार्गदर्शन केले. श्रीमती सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर सुनीता पवार यांनी आभार मानले. यावेळी वैशाली भगत, सुषमा राजमाने, लक्ष्मी पुपलवाड ,मीना कोकणे ,जयश्री राठोड, रेखा उघडे,  अबोली भगत, ठोंबरे, कांबळे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.