महिलांनी स्वावलंबी बनावे-शोभाताई अंबेकर

शांतीनिकेतन विद्या मंदिर शाळेत जागतिक महिला दिन साजरा

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :-संभाजीनगर प्रभागातील शांतीनिकेतन विद्या मंदिर शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संचालिका शोभाताई भास्करराव अंबेकर यांनी माँ जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केले.
यावेळी उपस्थिती महिला व विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना शोभाताई
अंबेकर म्हणाल्या की, महिलांनी स्वावलंबी बनावे, महिलांना व मुलींना ख-या
अर्थाने सक्षम करणा-या शिक्षणाची गरज आहे. कायदा विषयावर महिलांनी जागरुक
राहावे, महिलांनी स्वतःला वेळ देवून आरोग्य जपावे, असेही अंबेकर म्हणाल्या.

यावेळी महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभुषा
करुन उपस्थितांचे मने जिंकली. या कार्यक्रमाला महिला व विद्याथ्र्यांची
मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याच कार्यक्रमात गरीब, होतकरु, हुशार
विद्यार्थ्यांच्या पालक महिलांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सुनिता खरात, सविस्तर मार्गदर्शन अर्चना भालेराव यांनी केले
तर आभार प्रमिला जाधव यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, अंबादास घायाळ, शिक्षक मोहन
भदाडे,अशोक माधवाले,पांडुरंग वाजे, शिवहरी मांटे,अमोल पवार,शिवराम
गिराम,सुनील जाधव,पुरूषोत्तम चौरे,रमेश गाढवे,संजय खरात,वसंत गाडेकर
शिक्षिका सुनिता खरात, अर्चना भालेराव, पल्लवी खरात, किर्ती खैरे,अनिता
जाधव, कांचन वाघ, प्रमिला जाधव व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.