वैजापूर शहर व तालुक्यात पोलिओ लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 5440 बालकांना डोस

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- पोलिओचे समूळ उच्चटन व्हावे व लहान बालके पोलिओ पासून सुरक्षित राहावी म्हणून शासनाने संपूर्ण देशात रविवार (ता.27) रोजी पांच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमाला वैजापूर शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात 21 बूथ व 2 फिरते बूथ अशा एकूण 23 बूथवर 5880 पैकी 5440 म्हणजेच 85 बालकांना डोस पाजण्यात आले.
शासकीय रुग्णालयमार्फत बूथ लावून बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.शहर व तालुक्यात मिळून 85 टक्के पोलिओचे डोस पाजण्यात आले असून उर्वरित बालकांना उद्यापासून घरोघरी जाऊन डोस पाजण्याची व्यवस्था व नियोजन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी अफसर मुलतानी व रियाज शेख या दोन लहान बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून शुभारंभ केला.याप्रसंगी नागरिकांनी आपल्या छोट्या बालकांसह केंद्रावर गर्दी केली होती.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश राठी,डॉ.प्रमोद अभंग, रुग्णालयाचे विजय पाटील, रवी गडकरी,भास्कर दुधारे, श्याम उचित, रवी विणकरे, शुभांगी पांडे, स्वप्नाली चौधरी, आर,टी,नारळे, अफसर बेगम, लसीकरण मोहिमेच्या प्रमुख श्रीमती एस.ए. भुईगळ, मनीषा चौधरी, लक्ष्मीकांत दुबे, निर्मला जाधव, श्रीमती सिरसाट,अशोक गाडेकर व कर्मचारी उपस्थित होते,शहरात 21 बूथ व 2 फिरते बूथ असे एकूण 23 पोलिओ लसीकरण बूथ होते. प्रत्येक बुथवर तीन कर्मचारी नियुक्त केले होते..सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक नेमणूक करण्यात आली होती. उद्या सोमवार पासून उर्वरित पात्र बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्याचा कार्यक्रम आखला असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.