मराठा समाजाच्या प्रश्नांवर खा.संभाजीराजे भोसले यांचे आंदोलन ; वैजापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात वैजापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले असून मराठा समाज न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. शेतकरी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सकल मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खा.संभाजीराजे भोसले करत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वैजापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.शिवक्रांती सेनेचे सुनील बोडखे, सोमनाथ मगर, अनिल भोसले, मोतीराम वाघ, विजय वाघ, शिवाजीराजे साळुंके, नितीन शेलार, बाळू जाधव मंगेश जाधव, विशाल गायकवाड आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.