चंद्रा मीडिया,किर्दक चार्जर्स संघाचे दणदणीत विजय

अजय कावळेचे  ४० चेंडू मध्ये झंझावती शतक

एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धास सुरुवात

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर (मसिआ) आणि एएसआर इडस्ट्रीज यांच्या संयुक्तविद्यामाने २५ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धास शुक्रवारी (ता.२५) सुरुवात झाली.पहिल्या दिवशी तीन सामने झाले. यात किर्दक चार्जर्स (एमएसईबी) , चंद्रा मीडिया आणि दिग्विजय मर्व्हल जीएसटीने विजय मिळवला.

सिडको एन-२ येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही स्पर्धेचे सकाळी साडे दहा वाजता एएसआर इंडस्ट्रीजचे संचालक श्रीधर नवघरे, मासिआचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी मसिआचे उपाध्यक्ष किरण जगताप,सचिव चेतन राऊत ,माजी अध्यक्ष सुनील किर्दक, बालाजी शिंदे, ज्ञानदेव राजाळे,भारत मोतींगे, श्रीराम शिंदे, मनीष अग्रवाल, एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री गिरी, नामदेव खराडे, जयेश गायके , बाळासाहेब वाघमारे, संदीप भंडारी, स्पोर्ट कमिटी समन्वयक मंगेश निटूरकर, सदस्य राहुल घोगरे, अमित राजळे, संदीप पाटील, राजेंद्र मगर, अजिंक्य पाथरीकर, मयूर चौधरी यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आहे, स्पर्धेत पहिला सामना सकाळी आठ वाजता इंन्ड्रेस हाऊजर विरुद्ध किर्दक चार्जर्स (एमएसईबी) यांच्यात झाला.पहिल्या सामन्यात इंन्ड्रेस हाऊजर विरुद्ध किर्दक चार्जर्स (एमएसईबी) यांच्यात किर्दक चार्जर्स यांनी प्रथम फलंदाजी करत ७ बाद १२२ धावांची लक्ष इंन्ड्रेस हाऊजरला दिले. त्याचा पाठलाग करीत इंन्ड्रेस हाऊजरने पंधरा षटकात ६ खेळाडू बाद ७२ धावा करु शकले. या सामन्यात तीन षटकात तीन खेळाडू बाद करणारा कैलास शेळके मॅन ऑफ द मॅच राहिला.

चंद्रा एलेक्ट्रिकल मीडियाचा दणदणीत विजय

अजय कावळेचे शानदार शतक

अजय कावळे मॅन ऑफ द मॅच

दुसरा सामना हा चंद्रा मिडिया विरुध्द विश्‍व समुध्दी डॉमीनेटर्स(आयटी) यांच्यात झाला. यात चंद्रा मीडियाने पहिल्यांदा फलंदाजी करत १५ षटकात ५बाद १८७ धावांचा डोंगर उभा केला. याचा पाठलाग करताना विश्व समृद्धीच्या खेळाडूंनी पंधरा षटकात केवळ ९ बाद ८७ धावाच काढता आल्या. या सामन्यात चंद्रा मीडियाच्या अजय कावळे यांनी आक्रमक खेळी करत ४० चेंडू मध्ये शतक झळकवले. यात ८ षटकार तर आठ चौकारचा समावेश होता. या आक्रमक खेळीमुळे अजय कावळे हा मॅन ऑफ द मॅच ठरला. सामन्यात संभाजी कुटे यांनी दोन आणि संदीप लांडगे यांनी प्रत्येकी दोन खेळाडू बाद केले.

एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री गिरी, मासिआचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या हस्ते मेन दी मॅच पुरस्कार स्वीकारतांना फलंदाज अजय कावळे

तिसरा सामना हा सन्मान स्मॅशर्स (एमआयडीसी) विरुद्ध दिग्वीजय मार्वल्स (जीएसटी) यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना दिग्विजय मार्वल यांनी १५ षटकात ५ बाद १९७ धावा केल्या. त्यात प्रामुख्याने प्रशांत जाधव यांनी ५८, संतोष श्रीवास्तव- ३२ आणि गजेंद्र रामदिन यांनी २८ धावा दिल्या. नितीन जाधव यांनी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सन्मान स्मॅशर अतिशय कमी धावसंख्या उभारू शकले आणि दिग्विजय मर्व्हल जीएसटीने हा सामना सहज जिंकला. तीन्ही सामन्यांसाठी कोच म्हणून अमोल अभ्यांकर, बाळासाहेब चौधरी, विद्याधर पांडे, स्कोरर म्हणून विवेक घुगे ,व कॉमेंटेटर म्हणून सय्यद इब्राहिम व विवेक यांनी काम पाहिले.