भाषा संवर्धनासाठी मराठीचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे – कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

आरोग्य विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित कार्यक्रम उत्साहात

नाशिक,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भाषा संवर्धनासाठी मराठीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Displaying DSC_0150.JPG

    याप्रसंगी बोलताना कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, भाषा हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भाषा शिकत असताना मुलांची बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता महत्त्वाची असते. यासाठी सभोवतालचे वातावण व संस्कृतीचा भाषेवर प्रभाव असतो. भाषा समृध्द होण्यासाठी मातृभाषेतील साहित्याचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

       विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मराठी मराठी भाषेचा वापर मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे. कार्यलयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करणेबाबत शासनाने निर्देशित केले असून आपण नियमित संभाषण मराठी भाषेत करणं, लिहिणं, वाचन करणं, ऐकणं या सगळया गोष्टींची सवय प्रत्येकाने करावी. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवले तरच मराठी भाषा समृध्द होईल असे त्यांनी सांगितले. 

      विशेष कार्य अधिकारी ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद यांनी सांगितले की, लहान मुलांना भाषेचे प्रभुत्वाची जान करुन द्यावी जेणेकरुन मराठी मातृभाषा ही आपली खरी शक्ती आहे. यासाठी सर्वांनी सतत मराठी पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी  त्यास बळकटी मिळते असे त्यांनी सांगितले.

वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मराठी भाषेचा वापर केला तरच भाषा टिकेल यासाठी मराठी पुस्तकाचे वाचन करावे पुस्तक वाचनानंतर जवळच्या व्यक्तीस वाचनासाठी द्यावे जेणेकरुन वाचकांची संख्या वाढेल, भाषा समृध्द होईल व मराठीचा दैनंदिन जीवनात वापर वाढेल असे त्यांनी सांगितले.

        ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) व मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी गीतगायन, नाटयप्रवेश, कविता वाचन सादर केले. श्रीमती चेतना पवार,  श्री. प्रमोद पाटील, श्रीमती प्रतिभा बोडके, डॉ. संतोष कोकाटे, श्री. शैलेंद्र जमदाडे, श्री. प्रशांत कोठावदे, श्री. संजय मराठे, डॉ. संजय नेरकर, श्री. अनिल लंकेश्वर, श्री. एस.एस. मुलानी, श्रीमती लिना आहेर, श्री. किशोर पाटील, श्री. प्रल्हाद सेलमोकर यांनी विविध कविता, पुस्तकाचे अभिवाचन, गीत गायन आदी प्रकारात सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोविड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.