टीम ऑफ असोशिएशनतर्फे स्व. राहुल बजाज यांना श्रद्धांजली

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- बजाज समूहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण, श्री राहुल बजाज यांचे दि.१२ फेब्रुवारी रोजी देहवसान झाले.या अनुषंगाने आज रोजी टीम ऑफ असोशिएशन (सर्व औद्योगिक, व्यापारी तथा वाणिज्य संघटना) तर्फे आयोजित कार्यक्रमात स्व.श्री राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हा कार्यक्रम चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चर (सी.एम.आय.ए.), बजाज भवन, कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

सी.एम.आय.ए.चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजु यांनी स्व.राहुल बजाज यांच्या पेमेंट डिसिप्लिन, उद्योगाला अंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी चे प्रयत्न आणि, आपला कार्यभार सक्षम नेतॄत्वाच्या हाती पोहोचवणे या गुणांचा उल्लेख केला.

उद्योगपती ऋषी बागला यांनी श्री राहुल बजाज यांनी औरंगाबाद येथे बजाज हॉस्पीटल उभारणीसाठी शहरातील नागरीकांनी ५०% वाटा असावा असा आग्रह धरून लोकसहभागातून उभारणी व्हावी याबद्दल तसेच बागला कुटुंबीयांना औरंगाबाद येथे उद्योग उभारणीसाठी मदत केली याबद्दलचे अनुभव सांगितले.

Displaying WhatsApp Image 2022-02-17 at 7.33.59 PM.jpeg

सी.एम.आय.ए.चे माजी अध्यक्ष राम भोगले यांनी राहुल बजाज यांचा निर्भीड व्यक्तीमत्व व स्पष्ट वक्तेपणा याची उदाहरणे दिली. उद्योग वाढीसाठीच्या अमुल्य योगदानासाठी आपण त्यांचे कायम ऋणी राहाणार आहोत असे सांगितले.

Displaying WhatsApp Image 2022-02-17 at 7.34.28 PM.jpeg

बजाज ॲटो चे सी.एस.आर. सल्लागार व सी.एम.आय.ए.चे माजी अध्यक्ष सी.पी.त्रिपाठी यांनी औरंगाबाद येथे कमलनयन बजाज हॉस्पीटल उभारणीसाठी मोलाचे योग्दान याबद्दल माहीती दिली. त्यांनी श्री राहुल बजाज यांच्या बरोबर काम करताना लाभलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन याबद्दलचे अनुभव कथन केले.

सी.एम.आय.ए.चे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी बजाज ॲटो मध्ये काम करताना राहुल बजाज यांची कर्मचा-यांबरोबरची सद वर्तणुक याबद्दलचे अनुभव सांगितले.

या प्रसंगी सी.एम.आय.ए.चे मानद सचिव सतिश लोणीकर यांनी दिवंगत श्री राहुल बजाज यांच्या उल्लेखनिय कार्याचा गौरव केला व त्यांच्या कार्याची माहिती दिली.

Displaying WhatsApp Image 2022-02-17 at 7.33.59 PM (1).jpeg

मसिआचे अध्यक्ष नारायण पवार यांनी औरंगाबाद शहराला जगाच्या नकाशावर स्थान देण्यासाठीचे व औरंगाबादला ऑटो हब म्हणुन नावलौकीक मिळवून देणे या विशेष गुणांचा उल्लेख केला. व शहरात रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढीमध्ये मोठा वाटा आहे असे सांगितले.

सी.आय.आय. चे रिजनल चेअरमन श्री रमण अजगावकर श्री राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतात मोठी पातळी निर्माण झाली असे मत व्यक्त केले व श्री राहुल बजाज यांनी  वेंडर सेट उप निर्माण व्हावा असा अग्रह धरल्यामुळे उद्योजकता निर्माण वाढीस लागली असे सांगितले.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी श्री राहुल बजाज यांनी स्थानिक उद्योजकता वाढीसाठी केलेले प्रयत्न याबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सी.एम.आय.ए. चे मानद सचिव सतिश लोणीकर यांनी केले.सी.एम.आय.ए.चे कोषाध्यक्ष प्रितिश चटर्जी यांनी आभार प्रदर्शन केले व औरंगाबाद ची भरभराट हे केवळ बजाज मुळे शक्य झाली असे मत व्यक्त केले.

या कार्यक्र्मासाठी सी.एम.आय.ए.चे माजी अध्यक्ष कमलेश धुत, कमांडर अनिल सावे, सुरेश बापना, प्रसाद कोकीळ, अशिष गर्दे, रवी माच्छर आणि कार्यकारीणी सदस्य डॉ.सुनिल देशपांडे, सह- सचिव,अनिल माळी, बजाज ॲटो चे उपाध्यक्ष अभय पत्की, वाळुज पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप गुरमे तसेच सर्व औद्योगिक तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.