माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली,२८ जून /प्रतिनिधी :- माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. देशाच्या विकासामधले  त्यांचे व्यापक योगदान सदैव स्मरणात राहील. नरसिंह राव यांना प्रचंड ज्ञान आणि कुशाग्र बुद्धिमत्ता लाभली होती.

गेल्या वर्षी जूनमध्ये ‘मन की बात’ च्या भागात त्यांच्याविषयी मी व्यक्त केलेले  विचार सामाईक करत आहे, असे पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.