सूर्याला वंदन करून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा

औरंगाबाद,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- स्वातंत्र्याचा  अमृतमहोत्सवाचा मुहूर्त साधून क्रीडा भारतीने देशभरात ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. त्याचा भाग म्हणून शहरातील नागरिकांनी आज सूर्याला वंदन करून आपला सहभाग या उपक्रमात नोंदवला.

Displaying 567.jpg

हा राष्ट्रव्यापी उपक्रम पूर्ण करण्यासाठी क्रीडा-भारतीसह पतंजली योग पीठ, राष्ट्रीय योगासन महासंघ, गीता परिवार, भारतीय योग संस्था,आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट ने पुढाकार घेतला आहे. औरंगाबादेत हा उपक्रम शनिवारी शहरातील सिद्धार्थ उद्यानात घेण्यात आला.

Displaying 00567.JPG


प्रसिद्ध उद्योजक आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, भारतीय योग्य संस्थेचे डॉ. उत्तम काळवणे यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा आरंभ केला. क्रीडा-भारतीच्या देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Displaying 000000567.JPG

डॉ. काळवणे यांनी दैनंदिन आयुष्यात सुरनमस्काराचे महत्व अधोरेखित केले. कविता नावंदे यांनी शहरात योग प्रशिक्षण केंद्र सुरु कार्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका यावेळेला मांडली. सूर्यनमस्कारातून शरीराची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढते याचा स्वानुभव श्री. जाजू यांनी विषद केला.

Displaying 00000567.JPG

माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, पतंजली योग पीठचे कैलास पवार, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिवशंकर स्वामी,  गीता परिवाराचे सतीश साबू, योग संघटनेच्या छाया मिरकर, लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. सचिन बांगर यांची उपस्थिती यावेळी होती.

Displaying 000567.JPG

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय औरंगाबादकर, संदीप जगताप, भाऊ सुरडकर, शशिकला निलवंत, रोहित गाडेकर, सुरेश शेळके, आनंद अग्रवाल, उदय कहाळेकर, मीनाक्षी मुलीया, बाबासाहेब शेजवळ, ज्ञानेश्वर वाघ, प्रमिला आवळे यांनी परिश्रम घेतले.