खंडाळा ते भायगाव रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 85 लक्ष रुपये निधी मंजूर

आ.बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील खंडाळा ते भायगाव ( PMGSY ) 7/200 कि.मी. या रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ आज खंडाळा येथे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते झाला.

Displaying IMG-20220211-WA0085.jpg

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्ष साबेर खान,  बाळासाहेब संचेती, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG-20220211-WA0090.jpg


याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर,माजी नगराध्यक्ष साबेर खान आदींची भाषणे झाली. नगरसेवक डॉ. निलेश भाटीया, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पाटील जाधव, मोहनराव साळुंके, आनंदराव निकम, बाजार समितीचे संचालक सुनिल कदम, युवासेनेचे अमीर अली, श्रीराम गायकवाड, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उमेश शिंदे, गोटुभाऊ राजपूत, कमलेश आंबेकर, विभागप्रमुख नंदकिशोर जाधव, प्रकाश मतसागर, उपविभागप्रमुख अशोक हाडोळे, शासकीय गुत्तेदार उमाकांत ठोंबरे, प्रकाश वाघ, संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, बळीराम राजपूत, सरपंच गणेश पाटील इंगळे, कौशल्याबाई थोरात, राणीताई निकाळे, संजय पवार, प्रभाकर सोनवणे, राजुभाऊ राजपूत, उपसरपंच नीलकंठ ठोंबरे, मोबीन पठाण, वाल्मिक शेजुळ, संतोष कासलीवाल,अक्षय कुलकर्णी, अमोल बोरनारे, आत्माराम गायकवाड, संदीप पवार, विजय मगर, रामभाऊ त्रिभुवन, विजूनाना मगर, रहिम भाई, मुरलीनाना थोरात, वाल्मिक वाळके, दादासाहेब ठोंबरे, ईश्वर अंभोरे, बाळासाहेब जानराव, शुभम ठोंबरे, विजय शिंदे, पारसनाथ कदम यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.