वैजापूर तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी जनशक्ती पक्षातर्फे अर्धनग्न आंदोलन

वैजापूर ,​२२​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तहसिल कार्यालयातील संजय गांधी, श्रावणबाळ विभागात पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकारात लक्ष घालुन भ्रष्टाचार थांबवावा या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांंनी सोमवारी (ता.22) तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात अर्धनग्न आंदोलन केले.

प्रहारचे तालुका प्रमुख गणेश सावंत, उपतालुका प्रमुख सागर  गुंड, शहरप्रमुख विशाल शिंदे, राम पिल्दे, दत्ता सोनवणे, ज्ञानेश्वर तुरकणे, अरविंद पवार, अश्विन शिंदे आदींसह कार्यकर्त्यांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत उपविभागिय अधिकारी राहुल गायकवाड यांनी तातडीने आंदोनकर्त्यांची भेट घेतली. याबाबत चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.