भाजपला करू सत्तेच्या दूर, गाडून टाकू महागाईचा भस्मासूर

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे वैजापूर तालुक्यात जनजागृती

Displaying IMG-20211202-WA0168.jpg

वैजापूर ,५ डिसेंबर /प्रतिनिधी :-केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे वैजापूर शहर व ग्रामीण भागात निदर्शने करून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.लासुरगाव येथील देवी दाक्षायणी मंदिरात दर्शन घेऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या अभियानाला सुरुवात केली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ व जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर शहर व तालुक्यातील लासुरगांव, हडसपिंपळगांव, बोर दहेगांव,गोलवाडी, करंजगांव, बोरसर, विनायकनगर आदी गावांत महागाई विरोधात जनजागृती करण्यात आली.

Displaying IMG-20211202-WA0172.jpg

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी 2014 पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत असलेले जीवनावश्यक वस्तूंचे दर व आताचे दर याची यादी दाखवून नागरिकांमध्ये महागाई विरोधात जनजागृती करण्यात आली तसेच  निदर्शने करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घर खर्च भागवणं आता जमत नाही..’कसं बस जीवन जगतेय जनता, तरी बंद होत नाही भाजपचा लुटायचा धंदा’ ‘भाजपला करून सत्तेच्या दूर, गाडून टाकू महागाईचा भस्मासूर’ अशा घोषणा देऊन जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे नागरिकांना पटवून दिले.
भाजप सरकारच्या काळात देशात महागाईचा भडका उडाला आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या जनजागृती अभियानात काँग्रेसचे शहराध्यक्ष काझी मलिक, काँग्रेस सेवादलाचे सुनील बोडखे, युवक काँग्रेसचे सत्यजित सोमवंशी, भाऊसाहेब झिंजुर्डे, दिगंबर वाघचौरे, रजनीकांत नजन, गणेश पवार, कैलास पवार,नंदू निकम, तुषार रासणे,शौकत शेख, दीपक हरिसचन्द्रे,सचिन डावरे,भगवान गाजरे, आप्पासाहेब निघोटे, निवृत्ती गाजरे, बाळू सोनवणे,  गायकवाड, अनिल जाधव,संजय कानाने, शंकर गायकवाड, पंडित पवार, बजरंग पवार, लिलाबाई बागुल, मंगलबाई बागुल, विमलबाई तांबे, परिगाबाई जाधव, सत्यभामाबाई बोडखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.