शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांचा वाढदिवस वैजापूर तालुक्यात विविध कार्यक्रमाने साजरा ; धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Displaying IMG-20211207-WA0145.jpg

वैजापूर ,८ डिसेंबर /प्रतिनिधी :- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांचा वाढदिवस वैजापूर तालुक्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. दहेगांव-पालखेड दरम्यान समृध्दी महामार्गावर धावण्याची भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवसेना व युवासेना लासुर विभाग तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी मिसाळ व बिंदास माध्यम समूहाचे प्रविण पाटील भाडाईत यांच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी वैजापूर तालुक्यातील दहेगांव-पालखेड दरम्यान असलेल्या समृध्दी महामार्गावर धावण्याची भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.आ.दानवे यांनी भगवा ध्वज दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेला तालुक्यातील तरुण- तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रा. राजाभाऊ शेळके यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजयी स्पर्धकांना आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी आदींची समयोचित भाषणे झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकाप्रमुख कल्याण जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते खुशालसिंग राजपूत, नगरसेवक प्रकाश पाटील चव्हाण, बाळासाहेब जाधव, पारस घाटे, भाऊसाहेब पाटील गलांडे, सलीम वैजापुरी, ज्ञानेश्वर टेके, युवासेनेचे आमेर अली, श्रीराम गायकवाड, किशोर धुमे, संदीप बोर्डे, दादासाहेब पगार, संदेश वाघ, रामचंद्र शेळके, भानुमामा जगदाळे, वाल्मिक धनाड, रवी घोडके, पी.आर.जाधव महाराज, ज्ञानेश्वर पगार, स्वाती भाडाईत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.