राजेश टोपे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लायमर संघास विजेतेपद

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गणतंत्रदिनानिमित्त  राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जालना शहरातील आझाद मैदानावर  जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहिम यांनी आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये 26 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला. शेवटचा फायनल सामना लायमर  क्रिकेट संघ व द वॉलीयर क्रिकेट संघात झाला. अटीतटीत हा सामना लायमरने जिंकला. लायमर क्रिकेट संघास प्रथम 51 हजाराचे बक्षीस व चषक ना. राजेश टोपे यांच्या  हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एकबाल पाशा, सय्यद रहिम,संजय दाड,  शाह आलम  पठाण, गणेश सुपारकर, अन्वर मिर्झा, अमजद खान,कैसर शेख, शेख हसन, नंदकुमार जांगडे, मझहर सौदागर, रहेमान बेनिवाले, फारूक तोंडीवाले आदिंसह क्रिकेट खेळाडूंची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मझहर खान बिल्डर, सय्यद खिजर, अफजल सौदागर, अंन्सार परसुवाले, नईम मिर्झा आदिंनी परिश्रम घेतले.