आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत फैजल कुमार, इशाक इकबाल, पारस दहिया, सूरज यांचे सनसनाटी विजय

पुणे, 22 मार्च 2021:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत फैजल कुमार, इशाक इकबाल पारस दहिया, सुरज आर प्रबोध रणजीत विराली-मुरुगुसेन या भारतीय खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.   

Displaying Ishaque Eqbal.jpg
इशाक इकबाल(भारत)


डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या दहाव्या मानांकित फैजल कुमार याने अव्वल मानांकित अनिरुद्ध चंद्रसेखरचा 6-4, 3-6, 17-15 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. इशाक इकबाल याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवता नवव्या मानांकित चंद्रिल सूदचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.

Displaying Paras Dahiya ..jpg
Paras Dahiya (Ind)

बाराव्या मानांकित पारस दहिया याने पाचव्या मानांकित रोमानियाच्या जॉर्ज बोटझेनचा 6-2, 6-3 असा तर, तेराव्या मानांकित रणजीत विराली-मुरुगुसेन याने सहाव्या मानांकित ऋषी रेड्डीचा 7-5, 2-6, 10-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.

Displaying N. Vijay Sundar Prashanth..jpg
N. Vijay Sundar Prashanth (Ind)

सातव्या मानांकित भारताच्या एन. विजय सुंदर प्रशांत याने अमेरिकेच्या पंधराव्या मानांकित प्रेस्टन ब्राऊनचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्ठात आणले.

Displaying Suraj R Prabodh..jpg
Suraj R Prabodh (Ind)

अकराव्या मानांकित सूरज आर प्रबोध याने आठव्या मानांकित मुतु आदीथ्य सेंथीलकुमारवर 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला.  

Displaying Ranjeet Virali-Murugesan.jpg
Ranjeet Virali-Murugesan (Ind) 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: पुरुष गट:फैजल कुमार(भारत)[10]वि.वि.अनिरुद्ध चंद्रसेखर(भारत) [1] 6-4, 3-6, 17-15;इशाक इकबाल(भारत)वि.वि.चंद्रिल सूद(भारत) [9]  6-3, 6-2;ओमनी कुमार(यूएसए)[3] वि.वि.दिग्विजय प्रताप सिंग(भारत) [14] 7-6(1), 7-5;  हेनरी पॅटन(ग्रेट ब्रिटन) [4] वि.वि. लिओनार्ड कॅटनी(इटली)[16] 6-2, 6-4; पारस दहिया(भारत)[12]वि.वि.जॉर्ज बोटझेन(रोमानिया)[5] 6-2, 6-3; रणजीत विराली-मुरुगुसेन(भारत)[13]वि.वि.ऋषी रेड्डी(भारत)[6]  7-5, 2-6, 10-4; एन. विजय सुंदर प्रशांत(भारत) [7]वि.वि.प्रेस्टन ब्राऊन(यूएसए)[15] 6-2, 6-1;सूरज आर प्रबोध(भारत)[11]वि.वि.मुतु आदीथ्य सेंथीलकुमार(भारत)[8] 6-2, 6-2;

भारताच्या सिद्धार्थ रावतला अग्रमानांकन ,दुहेरीत  एन विजय सुंदर प्रशांत व विष्णू वर्धन यांना अव्वल मानांकन 

पुणे, 22 मार्च 2021:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत जागतिक क्रमवारीत 468व्या स्थानी असलेल्या भारताच्या सिद्धार्थ रावत याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तर दुहेरीत एन विजय सुंदर प्रशांत व विष्णू वर्धन या भारताच्या जोडीला अग्रमानांकन देण्यात आले आहे. 
एकेरीत आर्यलँडच्या सिमॉन कार व ग्रेट ब्रिटनच्या एडन म्यूकुक यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले.  अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्डला चौथे, स्वीडनच्या जोनाथन म्रिधाला पाचवे, तर भारताच्या मनिष सुरेशकुमारला सहावे आणि नुकताच राष्ट्रीय विजेता ठरलेला पुण्याचा अर्जुन कढेला सातवे व लखनऊ व इंदोर येथील आयटीएफ स्पर्धेतील विजेत्या अमेरिकेच्या झेन खानला आठवे मानांकन मिळाले आहे. 
मुख्य ड्रॉसाठी 980चा कट ऑफ असून यामध्ये 14 परदेशी खेळाडूंसह 18 भारतीय खेळाडूमध्ये 4 वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.  
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: पुरुष: एकेरी: 1. सिद्धार्थ रावत(भारत,468), 2. सिमॉन कार(आर्यलँड,546), 3. एडन म्यूकुक(ग्रेट ब्रिटन, 559), 4.ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका, 576), 5.जोनाथन म्रिधा(स्वीडन, 585), 6.मनीष सुरेशकुमार(भारत,671), 7.अर्जुन कढे(भारत,708), 8.झेन खान(अमेरिका,717);
दुहेरी:
1. एन विजय सुंदर प्रशांत(भारत)/विष्णू वर्धन(भारत), 2.लुका कॅस्टलनुव्हो( स्वित्झर्लंड)/अर्जुन कढे(भारत), 3.फिलिप बार्जेव्ही(स्वीडन)/जोनाथन म्रिधा(स्वीडन), 4. अनिरुद्ध चंद्रसेकर(भारत)/निकी पोनाच्चा कलियांदा(भारत)